अडसुळ टेक्नीकल कॅम्पस येथे सायबर अव्हरनेस कार्यक्रम उत्साहात पार…आर्थीक फसवणुक,फेक अकांऊट, मोबाईल हॅकिंग फसवणुकीपासुन कसे वाचता येईल या बाबत पोलिसांनी केले मार्गदर्शन
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर कडून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यातील चास येथील साकेश्वर ग्रामीण विकास संस्था,अडसुळ टेक्नीकल कॅम्पस येथे सायबर अव्हरनेस कार्यक्रम घेण्यात आला.या टेक्नीकल कैम्पस मध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंग,कॉम्पुटर इंजिनिअरिंग,एमबीए, पॉलीटेक्नीक,बीफार्मसी,डी फार्मसी,बीएड डीएड,एमसीए कॉलेजचे एकूण ८५० विदयार्थी तसेच चेअरमन प्रोफेसर श्री. अनिरुध्द अडसुळ सर,प्राचार्य डॉ.प्रदिप पाटील सर,डॉ.अंकुश शिर्के सर,डॉ.दिनेश अडोकर, श्रीमती.प्रियंका कंधारे मॅडम,श्री. वैभव लोंढे सर,व सर्व HOD स्टाफ असे सायबर अव्हरनेस प्रोग्रॅमला हजर होते.सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.मोरेश्वर पेंदाम यांनी विदयार्थीनी व विदयार्थाना डिजीटल अरेस्ट,मोबाईल हँकिग, फेक अकांऊट तयार करणे, आर्थीक फसवणुकीबाबत विदयार्थी व प्राध्यापक यांना माहिती देऊन कश्या प्रकारे फसवणुक होते व फसवणुकीपासुन कसे वाचता येऊ शकते,सायबर गुन्हे तपासाची पध्दत,व कोणत्या प्रकारे आरोपीला पकडले जाते याबाबत तसेच आयटी अॅक्ट अंतर्गात येणारे सायबर गुन्हेबाबत सर्व माहिती व सायबर पोलीस स्टेशनला दाखल होणारे गुन्हे व त्यास असणारे शिक्षा व द्रव्यदंड किती आहे याबददल माहिती दिली.
पोलीस नाईक अभिजीत अरकल यांनी विदयार्थी व प्राध्यापक यांना पीपीटीव्दारे सायबर क्राईमचे प्रकार,कोण कोणत्या प्रकारे फसवणुक केली जाते,डेबीट कार्ड,क्रेडिट कार्ड,बैंक डिटेल्स, व ओटीपी शेअर न करणेबाबत, व्हॉटसअॅप व्हीडीओ कॉलव्दारे, बँकेचे नांवाने येणारे एपीके लिंक फाईलव्दारे,बँकेचे नांवाने खोटे कॉल व्दारे,लॉटरी लागली या खोटे कॉलव्दारे,शेअर्समध्ये ट्रेडीगमध्ये गुंतवणुक करुन जास्त परतावा देणेबाबत,टार्गेट पूर्ण करुन पैसे मिळविणेबाबत, व्हीडीओ शेअर्स करुन पैसे मिळणेबाबत,फेक वेबसाईट, मोबाईल हैंकिंग,व आपले बँकेचे पासवर्ड व सिक्युरीटी अपडेट ठेवणेबाबत व वेळोवेळी पासवर्ड चेंज करणेबाबत,अनोळखी फ्रेण्ड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करु नये,कोणत्याही लिंकवर आपली माहिती अपडेट करु नये किंवा माहिती शेअर करु नये,एनी डेस्क, टीमकुअर असे अॅक्सेसेबल अॅप्लीकेशन डाऊनलोड करु नये,या सर्वाची माहिती दिली.तसेच अडसुळ कॅम्पस येथे सायबर अव्हरनेस प्रोग्रॅम कार्यक्रमाचे दरम्यान दि.२३ सप्टेंबर २०२५ रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज,कला वाणिज्य विज्ञान महाविदयालय, श्रीगोंदा येथे पार पडलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा आंतर महाविदयालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये अडसुळ टेक्निकल कॅम्पस मधील इलेक्ट्रॉनिक्स आणि दुरसंचार (E&TC) विभागातील दुसऱ्या वर्षामध्ये शिकत असलेला विदयार्थी श्री. समर्थ सजन याने १२५ किलो वजन गटात तीन फेऱ्या जिंकत व्दितीय क्रमांक पटकाविला व त्याची २७ सप्टेबर २०२५ रोजी बारामती येथे होणाऱ्या पुणे विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती त्याबददल श्री.समर्थ सजन व त्याचे स्पोर्टस टिचर यांचे सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सायबर अवरनेस प्रोग्रॅम दरम्यान बरेच विदयार्थी व विदयार्थीनी चे सायबर गुन्हेबाबत,युपीआय बाबत, ऑनलाईन व्यवहाराबाबत, वेबसाईटबाबत,व्हॉटसअॅप व्हिडीओ कॉलबाबत,नायजेरीन फ्रॉडबाबत,व्हॉटसअॅप हॅकबाबत त्यांच्या मनात असलेल्या शंका व कुशंका/प्रश्ना बाबत सविस्तर निरासन करण्यात आले.कॉलेजमधील सर्व विदयार्थी,प्राचार्य,प्राध्यापक या प्रोग्राम मुळे व माहिती मिळाल्यामुळे आनंदीत झाले.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक श्री. वैभव लोंढे यांनी विशेष पुढाकार घेतला.पोनि.श्री.मोरेश्वर पेंदाम यांनी प्राचार्य व अडसुळ कॅम्पसचे विशेष आभार व्यक्त केले.प्राचार्य श्री.प्रदीप पाटील व श्रीमती, प्रियंका कंधारे यांनी सायबर पोलीस स्टेशनचे आभार मानले.या सायबर अव्हरनेस कार्यक्रमासाठी सायबर पोलीस स्टेशन निरीक्षक श्री.मोरेश्वर पेंदाम,पोलीस नाईक अभिजीत अरकल,महिला पोलीस हवालदार सविता खताळ, पोलीस नाईक दिपाली घोडके, चासफो मोहम्मद शेख यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.