इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून महिलेची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहमदनगर प्रतिनिधी(दि.११ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात राहणार्या एका महिला प्राध्यापिकेच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून बदनामी केल्याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिलेने गुरूवारी ता.९ फेब्रुवारी रोजी याबाबत फिर्याद दिली आहे.डिसेंबर 2022 मध्येच ही घटना उघडकीस आली होती.पीडित प्राध्यापिका संगमनेर तालुक्यातील तिच्या गावातून ती काम करत असलेल्या महाविद्यालयात बसने जात असताना तिच्या सहकारी प्राध्यापकांनी फोन करून तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मला मेसेज का करता असे विचारले.मात्र,सदर प्राध्यापिकेने माझे इंस्टाग्रामवर कोणतेही अकाऊंट नसल्याचे सांगितले. त्यांनी स्क्रिनशॉट काढून व्हॉट्सपवर पाठविले.त्यानंतर इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट करण्यात आल्याचे प्राध्यापिकेच्या लक्षात आले. त्यामुळे प्राध्यापिकेच्या नावाचा व फोटोचा वापर करून बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून बदनामी केल्याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.