Maharashtra247

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी घातक शस्त्रांसह जेरबंद नगर तालुका पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.११ फेब्रुवारी):- दि.11 फेब्रुवारी रोजी नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत खंडाळा गावचे शिवारात काही इसम हे घातक शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या तयारीने संशयितरित्या फिरत आहेत.अशी माहीती नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस पथकासह खंडाळा गावचे परिसरात संशयितरित्या फिरणा-या इसमांचा शोध घेत असतांना पहाटे 02/30 वा.चे सुमारास 05 संशयित इसम हायवेच्या दिशेने पऴतांना दिसुन आले.त्यापैकी चार इसम हायवेलगत लावलेल्या एका करड्या रंगाचा क्रुझर गाडी क्र.MH-20BY-3468 ही मध्ये बसले होते व एक इसम हा अंधाराचा फायदा घेऊन पळुन जाताना दिसला.तसेच सदर क्रुझर गाडीही नगरच्या दिशेने पळुन जात असताना पोलीस स्टाफ व खंडाळागावचे विकास लोटके व इतर ग्रामस्थ यांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करुन सदर क्रुझर गाडी ही पुणे हायवेवरील केडगाव बायपास चौकात पहाटे 03/00 वा.चे सुमारास थांबविली व सदर गाडीच्या जवळ जाऊन गाडीतील इसमांना ताब्यात घेतले व त्यांना त्यांचे नाव, गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे 1)सिकंदरसिंग शक्तीसिंग ज्युनि,वय-38 वर्षे, रा.आलाना,(ब्रुकबॉन्ड जवळ),गेवराई,ता.जि. }औरंगाबाद, 2)जितेंद्रसिंग संतोषसिंग टाक,वय 30 वर्षे, रा.आलाना,(ब्रुकबॉन्ड जवळ), गेवराई,ता.जि.औरंगाबाद,3) दलसिंग बालासिंग टाक, वय-19 वर्षे,रा.आलाना, (ब्रुकबॉन्ड जवळ),गेवराई,ता. जि.औरंगाबाद,4) शाह अन्सार मंजुर शाह,वय-21 वर्षे,रा.चितेगाव,ता.पैठण,जि. औरंगाबाद असे असल्याचे सांगितले.त्यांचेजवळ क्रुझर गाडीमध्ये त्यांचे कब्जात क्रुझर गाडी,विविध प्रकारचे लोखंडी पान्हे,लोखंडी रॉड,कोयते, स्क्रुड्रायव्हर,रस्सी,लोखंडी साखळी,विळा,लोखंडी पाईप, लोखंडी हुक पाईप,असा 5 लाख 12 हजार,800 रु. किं. चा मुद्देमाल मिळुन आल्याने वरील इसमांना मुद्देमालासह पोलीस स्टेशनला आणुन त्यांचे विरुद्ध भादविक/399,402,आर्म अँक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सिकंदरसिंग शक्तीसिंग ज्युनि, वय- 38 वर्षे,रा.आलाना, (ब्रुकबॉन्ड),गेवराई,ता.जि. औरंगाबाद याचेवर औरंगाबाद येथे विविध पोलीस स्टेशनमध्ये चार गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी नामे जितेंद्रसिंग संतोषसिंग टाक,वय 30 रा.आलाना,(ब्रुकबॉन्ड),गेवराई,ता.जि.औरंगाबाद याच्यावर औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत.सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला अहमदनगर,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अजित पाटील ग्रामीण विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहा.पो.निरीक्षक राजेंद्र सानप,पो.उपनिरीक्षक युवराज चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारग, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ढवळे,पोहेकाँ/संतोष लगड,चापोहेकाँ/कैलास इथापे,पोना/आनंद घोडके, पोकाँ/सोमनाथ वडणे,पोकाँ/संभाजी बोराडे,पोकाँ/विक्रांत भालसिंग,पोकाँ/विशाल टकले,चापोकाँ/विकास शिंदे, होमगार्ड/भाऊसाहेब पवार यांच्या पथकाने केलेली आहे.

 

You cannot copy content of this page