Maharashtra247

देवळी पुलगावचे आमदार रणजित कांबळे बनले कातकर,नाचणगावच्या शंकरपटात हाकालला शेकडा,दुमदुमली भिर्रर्र..ची आरोळी,फिटले पट शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे

वर्धा प्रतिनिधी(सागर झोरे):-सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावरील बंदी उठल्यानंतर नागरिकांचा उत्साह आता पाहण्यासारखा आहे.वर्धा जिल्हात सिद्धेश्वर कृषक मंचच्या वतीने भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.आज या शंकरपटाचे उदघाटन आमदार रणजित कांबळे व खासदार रामदास तडस यांच्या हस्ते पार पडले.यावेळी देवळी पुलगावचे आमदार रणजित कांबळे यांनी बैलांचा शेकडा हाकलून शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.आमदार कांबळे यांनी शंकरपटाच्या उद्घाटनावेळी शेकडा हाकलण्याचा आनंद लुटला.बैलगाडी हाकणे आणि शेकडा हाकलणं यात फरक असतो.शेकड्याला जुंपलेले बैल तुफान असतात.पटाचे बैल असल्यानं ते सैराट सुटतात.शेकडा हाकलण्यासाठी मजबूत बांध्याचे कातकर हवेत. कातकर होण्यासाठी हिंमत लागते.ही हिंमत आमदार कांबळे यांनी दाखविली.उद्घाटनावेळी त्यांनी शेकडा हाकलला.उपस्थित लोकं हे सारं पाहत होते.यावेळी खासदार रामदास तडस सुद्धा उपस्थित होते.तीन दिवस चालणाऱ्या या शंकरपटात मोठ्या प्रमाणात बक्षीस ठेवण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविल्यावर शर्यतीसाठी अनेक नियम बनविण्यात आले आहे.आयोजकांनी नियमांच्या आधीन राहून उत्साहात हा कार्यक्रम घ्यावा.शंकरपट म्हणजे बळीराजाचा म्हणजेच आपल्या जगाच्या पोशिंद्याचा खेळ आहे.जेव्हा बंदी होती तेव्हा शेतकऱ्यांवर संकट आले होते कारण बंदी असल्याने या बैलांना पोसण्यात खूप खर्च होत होता आणि बैलांची किंमत कमी होत होती आता सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे असं खासदार रामदास तडस म्हणाले.नाचणगाव येथे पटाचे मैदान दोन दिवस सळसळत्या उत्साहात कार्यक्रम होत आहे.पट शौकिनांच्या उपस्थितीत उदघाटन पार पडले असून पटाच्या दाणीवर आठ वर्षांनी वाऱ्याच्या वेगाचा थरार अनुभवत भिर्रर्रर्र.. ची आरोळी आली आहे.

You cannot copy content of this page