सराईत मोटारसायकल चोर कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-दि.२८/०९/२०२५ रोजी कोतवाली पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार सर्फराज हसन सय्यद रा.मुकुंदनगर अहिल्यानगर) हा नगर शहर परिसरात विविध ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी चोरी करून त्या विक्री करण्याच्या उद्देशाने पुणे शहर व अहिल्यानगर येथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांशी संपर्क ठेवून त्यांना विक्री करीत असतो.
मिळालेल्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी विशेष पथक तयार करून कारवाईचे नियोजन केले. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी संशयित सर्फराज हसन सय्यद यास दि.२८/०९/२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने नगर शहर परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.तसेच त्याने स्वतःहून कबुली देत गुन्ह्यात वापरलेल्या दोन व त्याचा दाजी अनिस मुस्ताक खान याने एक मोटारसायकल कोतवाली पोलीस ठाण्यात आणून दिली.पुढील तपास महिला पोलीस नाईक वर्षा पंडित या करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलूबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक श्री.गणेश देशमुख,पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड,विक्रम वाघमारे,सूर्यकांत डाके,विनोद बोरगे,विशाल दळवी,सलीम शेख,साबीर शेख,वसीम पठाण, अविनाश वाकचौरे,विजय ठोंबरे, अभय कदम,अमोल गाडे,अतुल काजळे,शिरीष तरटे,हरिदास कोतकर,सचिन लोळगे,सत्यम शिंदे,महेश पवार,सोमनाथ केकान,मपोना.प्रतिभा नागरे, दीपक रोहकले यांनी केली आहे.
या कारवाईमुळे अहमदनगर शहर व परिसरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यास मोठे यश मिळाले आहे. नागरिकांनी कोतवाली पोलिसांचे विशेष कौतुक केले असून,भविष्यात अशा प्रकारच्या चोरींना आळा बसेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
