भारतीय जनता पक्ष शहर जिल्हा ओबीसी मोर्चाची कार्यकारणी जाहीर..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भारतीय जनता पक्ष शहर जिल्हा ओबीसी मोर्चाची नवी कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.या प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि विविध प्रश्नांसाठी संघटित लढा उभारण्याच्या निर्धाराने ही कार्यकारणी स्थापन करण्यात आली आहे.
या वेळी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषद सभापती रामजी शिंदे,मा.खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील,तसेच जिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते यांनी नव्या कार्यकारिणीचे मनःपूर्वक अभिनंदन केले.कार्यकारिणीचे अध्यक्ष गणेश विद्ये व सहकारी पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून मान्यवरांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी मा.नगरसेवक ॲड.धनंजय जाधव,सरचिटणीस मा.नगरसेवक निखिल वारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांना गती मिळेल, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.