हातात कोयता घेऊन दहशत..बोल्हेगाव फाट्यात इसम जेरबंद..एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई..
अहमदनगर (दि.३ ऑक्टोबर):-बोल्हेगाव फाटा परिसरात हातात कोयता घेऊन नागरिकांना धमकावणाऱ्या रवि ज्ञानेश्वर साळुंके (वय २१, रा. शिंदे कॉलनी,बोल्हेगाव फाटा) या इसमाला एमआयडीसी पोलिसांनी रंगेहात पकडले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक बी.चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
त्याच्याविरुद्ध गु.र.नं. ७५२ /२०२५, भारतीय शस्त्रास्त्र कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबरमे,उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी,पोलीस अंमलदार राकेश खेडकर,संदीप पवार,राजू सुद्रिक,देविदास खेडकर, किशोर जाधव नवनाथ दहिफळे ज्ञानेश्वर आघाव उमेश शेरकर यांनी केली आहे.एमआयडीसी पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास दृढ झाला आहे.