उपनगरात युवतीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर शहरातील पाईपलाईन रोडवरील उपनगरात एक धक्कादायक घटना घडली असून एका तरुणीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.या घटनेने परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली.जखमी युवतीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. हल्ला नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.युवतीवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे.