जिल्हा रुग्णालयात महिला कक्ष सेविकेला लज्जास्पद मागणी; प्रशासकीय अधिकाऱ्याचे नाव चव्हाट्यावर..!
अहिल्यानगर (दि.४ ऑक्टो प्रतिनिधी):-अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय अधिकाऱ्याने कक्ष सेविकेला रुग्णालयातील महिला अधिकारी आणि एका महिला परिचारिका यांच्या मार्फत शारीरिक सुखाची मागणी केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.
पीडित कक्ष सेविकेने शासनाच्या 104 या पोर्टलवर दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी तक्रार नोंदवली आहे.तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.या प्रकारामुळे प्रशासकीय दबावाखाली कारवाई थांबवली जात असल्याची चर्चा जिल्हा रुग्णालयात सुरु असून, अनेक कर्मचारी दबक्या आवाजात याबाबत बोलत आहेत. पीडित सेविकेने गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु असल्याचे समजते.या संतापजनक घटनेमुळे केवळ आरोग्य विभाग नव्हे तर संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे मान खाली घालायला लागले आहे. नागरिकांनी या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी केली आहे.