आदिवासी विकास परिषदेची मागणी पिडित महिले वरील अत्याचारप्रकरणी तात्काळ ॲट्रॉसिटी अंतर्गत एफ.आय.आर.दाखल करावी अन्यथा 9 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण
(प्रतिनिधी):-आदिवासी विकास परिषद,ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष किशोर अनंत सुर्वे यांनी पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांना पत्र देऊन पीडित महिले वरील अत्याचारप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मागासवर्गीय महिला सभासद यांच्यावर अन्याय झाल्याची बाब लक्षात घेता संबंधित प्रकरणी एफ.आय.आर. दाखल करण्याची गरज आहे. मात्र अद्याप गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.
यामुळे पीडितेला न्याय मिळत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.सदर घटनेत एसी.बौद्ध सुचित्रा किशोर सुर्वे (वय ५३) यांच्यावर २९ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत सदरील आरोपींनी अपमानास्पद वागणूक देऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.त्या महिलेकडून वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून, यावर त्वरीत एफ.आय.आर. दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.श्री.सुर्वे यांनी स्पष्ट केले की,जर वेळेत कारवाई झाली नाही तर संबंधित पोलीस प्रशासना विरोधात आंदोलन छेडले जाईल.व 9 ऑक्टोबर 2025 पासून हिल लाईन पोलीस स्टेशन बाहेर सकाळी 11 वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येईल.न्यायासाठी आमचा लढा सुरू राहील,असेही त्यांनी नमूद केले आहे.