“फक्त एक फोन…आणि सुरू झाली रस्त्यांची उजळण!”..डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंडळ अध्यक्षा सौ. निर्मलाताई कांबळे यांची तत्पर सेवा
लातूर (दि.११ ऑक्टोबर/प्रतिनिधी):- प्रभाग क्रमांक दोनमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी विद्युत पोलवरील लाईट बंद पडल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंडळाच्या अध्यक्षा सौ. निर्मलाताई रमेश कांबळे यांनी तातडीने पुढाकार घेत महानगरपालिका विद्युत विभागाशी संपर्क साधून बंद पडलेल्या लाईट्स सुरू करून घेतल्या.

काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे लाईट्स तत्काळ सुरू होऊ शकल्या नाहीत, मात्र त्या देखील लवकरच कार्यान्वित केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.सौ. निर्मलाताई कांबळे यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, “प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या सेवेसाठी मी नेहमी तत्पर आहे. कोणतीही समस्या असो – फक्त एक फोन करा किंवा संपर्क साधा, तुमची अडचण तातडीने सोडवली जाईल.”नागरिकांनी त्यांच्या या तत्परतेचे आणि सेवा भावनेचे कौतुक केले असून, त्यांच्या कार्यामुळे परिसरात उजेड परत आला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडळाच्या माध्यमातून सामाजिक व नागरी सेवेत सक्रिय असलेल्या सौ. निर्मलाताई कांबळे यांचे कार्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
