अहिल्यानगरात रविवारी शिवशक्ती-भीमशक्तीचा विराट जनआक्रोश मोर्चा..! आ.संग्राम जगताप, सागर बेग,ॲड.वाल्मिक निकाळजे यांची उपस्थिती;शहरात उत्साहाचा माहोल..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीने येत्या रविवारी, दि.१२ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर शहरात शिवशक्ती-भीमशक्ती एकतेचे प्रतीक ठरणारा भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चास नगर शहराचे आमदार संग्राम जगताप,हिंदुत्ववादी नेते सागर बेग आणि ॲड.वाल्मिक निकाळजे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून,शहरात या मोर्चाबाबत मोठा उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.हा मोर्चा हिंदू एकतेचे व राष्ट्रनिष्ठेचे प्रदर्शन ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून होणार असून, मार्केटयार्ड चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक,पंचपीर चौक, सर सेनापती तात्या टोपे चौक, तुळशी दरवाजा,माणिक चौक, कापडबाजार, तेलीखुंट चौक, चितळे रोड,चौपाटी करंजा मार्गे हा मोर्चा दिल्लीगेट येथे पोहोचेल.दिल्लीगेट येथे मोर्चाची सांगता सभा होणार असून, या सभेला आमदार संग्राम जगताप, सागर बेग आणि ॲड.वाल्मिक निकाळजे हे मार्गदर्शन करणार आहेत.मोर्चाच्या तयारीसाठी शहरात कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून,सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.दरम्यान,पोलिसांनी सुरक्षेची सर्वतोपरी तयारी केली असून,वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
