कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या दहा गोवंशीय जनावरांना दिले जीवदान नगर तालुका पोलिसांची कारवाई
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१२ फेब्रुवारी):-कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 10 गोवंशिय जनावरांची सुटका करून 1 लाख 55 हजार किमतीच्या 10 गाई गोशाळेत केल्या जमा नगर तालुका पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.या घटनेची हकीकत अशी की जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस स्टेशनला दिलेल्या होत्या,दि.12 फेब्रुवारी रोजी रात्री नगर तालुका पोलीस स्टेशन सपोनि/ राजेंद्र सानप याना वाळकी येथे कत्तलीसाठी गाई बांधून ठेवल्या असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली या वरून त्या ठिकाणी छापा टाकून 10 गोवांशिय जनावरांची सुटका करून 1 लाख 55 हजार किमतीच्या गाई गोशाळेत पाठवल्या आहेत.यातील आरोपी आसिफ कुरेशी (रा.भिंगार) याचे विरुद्ध नगर तालुका पोलिस ठाणे येथे गुरन 123/23 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5,5(अ) उल्लंघन कलम 8,8ई तसेच भारतीय प्राणी संरक्षण अधिनियम 1960 कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/राजेंद्र सानप,पोसई/युवराज चव्हान,सहायक पोसई/ दिनकर घोरपडे,पोना/योगेश ठाणगे यांनी केलेली आहे.