Maharashtra247

सामाईक बोअरवेल मधील पाणी वाटपाच्या वादातून एकास लोखंडी फावड्याने बेदम मारहाण 

 

संगमनेर प्रतिनिधी (दि.१२ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे सामाईक बोअरवेल मधील पाणी वाटपाच्या वादातून भावास लोखंडी फावड्याने मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि.९ फेब्रुवारी) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणी शिवाजी भिकाजी आव्हाड (वय ५१, रा.दरेवाडी,ता.संगमनेर) यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष भिकाजी आव्हाड याच्याविरुद्ध घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील अधिक माहिती अशी,दरेवाडी येथील शेतकरी शिवाजी आव्हाड यांची पत्नी त्यांच्या घरासमोरील टाकीत सामाईक बोअरवेल मधील पाणी भरत असताना त्याच वेळी शिवाजी यांचा भाऊ सुभाष तेथे आला आणि म्हणाला ‘तुम्ही बोअरवेलचे पाणी भरायचे नाही,आज आमचा नंबर आहे.त्यावेळी शिवाजी हे समजून सांगत असताना सुभाष यास राग आल्याने त्याने शिवाजी यांना शिवीगाळ करून तेथे पडलेल्या लोखंडी फावड्याने डोक्यात मारले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.दरम्यान,शिवाजी यांची पत्नी सोडविण्यास आली असता त्यांनाही शिवीगाळ करून हात पकडुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.या बाबत अधिक तपास पोलीस करीत आहे.

You cannot copy content of this page