Maharashtra247

समता नगर प्रभाग १६ येथे भारतीय जनता पार्टीच्या शाखेची स्थापना;कॅबिनेट मंत्री नामदार अतुलजी सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला शुभारंभ

 

नाशिक प्रतिनिधी(दि.१२ फेब्रुवारी):- नाशिक येथील प्रभाग क्रमांक १६ समता नगर येथे भारतीय जनता पार्टी युवा वारीयर्सच्या शाखेची स्थापना युवानेते विक्रांत अनिल गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.या शाखेच्या उदघाटनास महाराष्ट्राचे सहकारमंत्री तसेच जालना व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अतुलजी सावे,भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष आ.राहुल लोणीकर व मार्गदर्शक सुनील फरांदे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.अतिशय उत्साहात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या अतिषबाजीत भाजपाचा झेंडा समता नगर येथे रोवण्यात आला.या वेळी भाजपा व आ.देवयानीताई फरांदे यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.कार्यक्रमास प्रदेश पदाधिकारी भैरवीताई वाघ,मंडल अध्यक्ष भास्करजी घोडेकर,नगरसेवक अनिल ताजनपुरे,पवन उगले यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी सरचिटणीस श्री.शाम बोरदे,श्री.अतुल क्षीरसागर, युवा मोर्चा सरचिटणीस श्री. अमोल मानकर,उपाध्यक्ष सौ.सुमन विश्वकर्मा,प्रा.जगदीश माळी,श्री.दिपक हिरे,श्री.रतन काळे,सौ.नयना शर्मा,श्री. स्वप्नील गायकवाड,पै.कुणाल साळवे,नितीन गांगुर्डे,सचिन रुपवते,यांच्या सह प्रभागातील नागरिकांची उपस्थित होती.

You cannot copy content of this page