ग्रामविकासासाठी सदैव तत्पर असणारे गणेश दवंगे यांच्या नावाला चंदनापुरी गटातून पसंती..सामाजिक,धार्मिक कार्यात अग्रेसर व्यक्तिमत्वाला पंचक्रोशीतून मोठा पाठिंबा
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):- संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गट जिल्हा परिषदेसाठी खुला प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्याने इच्छुकांची मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. ग्रामविकासासाठी सदैव तत्पर असणारे धार्मिक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे भाजपाचे तालुका सरचिटणीस गणेश दवंगे यांच्या नावाला नागरिकांमधून मोठा पाठिंबा मिळत आहे.हिवरगाव पावसा व पंचक्रोशीत मदतीसाठी धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले गणेश दवंगे यांचा अल्पावधीतच हिवरगाव पावसा गावात आणि विकास कामे विविध उपक्रम राबविण्यात मोठा सहभाग राहिला आहे.पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे व आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे मंजूर करून आणले,तसेच अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.या कार्यक्षम व्यक्तिमत्त्वाचे नाव चंदनापुरी गटातून पुढे आल्याने हिवरगाव व चंदनापुरी पंचक्रोशीतून मोठा पाठिंबा मिळत आहे.
गणेश दवंगे यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शेती व व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग, सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभाग घेतात. विविध सामाजिक उपक्रम धार्मिक कार्यक्रमास आघाडीवर असणारे व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित आहे.व्यक्तिगत आणि अडचणी सोडवण्यासाठी प्रशासकीय सहकार्य करतात. शेतकऱ्यांना व्यक्तिगत लाभाच्या शासकीय योजना मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत.त्यांच्या पत्नी सुजाता दवंगे यांनी पाच वर्षे हिवरगाव पावसा ग्रामपंचायतचे उपसरपंचपदी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. आपल्या कार्यकाळात गरीब कुटुंबांना शासकीय लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. गरीब कुटुंबांना घरकुलाचा लाभ यासाठी लाभार्थ्यांमध्ये जनजागृती व सहकार्य केले. सामाजिक कार्यकर्ते गणेश दवंगे यांनी देवगड रस्त्यावरील उंच पुलासाठी संघटितपणे भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने मंत्रालय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला त्यामुळे आज देवगड रस्त्यावर सेतू फुल उभा आहे.
देवगड यात्रा उत्सव समितीच्या माध्यमातून यात्रा उत्सवात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,शाहू महाराज,आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक महापुरुषांच्या जयंती उत्सवात सक्रिय सहभाग असतो. अशा जनसामान्य, गोरगरीब व्यक्तींसाठी मदतीसाठी धावून जाणाऱ्या कार्यक्षम व्यक्तिमत्त्वाच्या नावाला चंदनापुरी जिल्हा परिषद गटातून मोठा पाठिंबा मिळत आहे.
