एमआयडीसी परिसरात घाटात ३९ किलो गांज्यासह तिघे जेरबंद..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर एम.आय.डी.सी परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत ३९ किलो वजनाचा गांजा आणि चारचाकी वाहन असा एकूण १३ लाख ७५ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या कारवाईत तीन इसमांना अटक करण्यात आली आहे.ही कारवाई श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.श्री.वमने यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने एम.आय.डी.सी परिसरातील विळदघाट येथे सापळा रचून ही कारवाई केली.पोलिसांनी चारचाकी वाहनातून विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त केला असून अटक करण्यात आलेले इसम पुढीलप्रमाणे आहेत —
१)सतीश विजय शिंदे (वय ४०, रा. निमगाव गांगर्डा,ता.कर्जत, जि.अहिल्यानगर),
२)अशोक माणिकराव तरटे (वय ६८,रा.कडा,ता.आष्टी,जि.बीड),
३)परसराम आनंदा परकाळे (वय ६५,रा.पिंप्री घुम्नी,ता.आष्टी, जि. बीड).
पोलीस अंमलदार रणजीत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुंगीकारक औषधद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा १९८५ चे कलम ८(क), २०(ब)II(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई विकास जाधव,एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.या यशस्वी कारवाईसाठी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे यांचे मार्गदर्शन लाभले.
पथकात मपोनि.ज्योती गडकरी, पोसई विकास जाधव,पोहेकाँ. गणेश धुमाळ,पोहेकॉ.देवीदास खेडकर,पोकाँ रणजीत जाधव, पोकाँ सचिन वीर,पोकाँ.निखील मुरुमकर,पोकॉ.किशोर जाधव आणि पोकाँ.नितीन शिंदे यांनी सहभाग घेतला.या कारवाईमुळे अहिल्यानगर ग्रामीण पोलीस दलाने पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत समाजात कायद्याचा धाक निर्माण केला आहे.
