“स्वच्छतेच्या लढ्यात चिंचोली गुरव गाव अव्वल..!स्व.वसंतराव नाईक पुरस्कारात प्रथम क्रमांक एक गाव,एक जिद्द,एक सन्मान!..ग्रामपंचायतीचा राज्यस्तरीय मान स्वच्छतेतून उजळला गावाचा चेहरा
संगमनेर प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):-अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोली गुरव ग्रामपंचायत यांना महाराष्ट्र शासनाच्या (स्व. वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा,सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन) अभियानांतर्गत सन 2023-24 मध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे.ही ऐतिहासिक कामगिरी चिंचोली गुरव ग्रामपंचायतीने अत्यंत अल्पावधीत घडवून आणली असून,ग्रामस्वच्छता, पर्यावरण सुरक्षा आणि लोकसहभाग या तिन्ही आघाड्यांवर गावाने उत्कृष्ट कार्य केले आहे.
👏 नेतृत्व आणि प्रयत्नांचा संगम
या यशामागे मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,मा.जिल्हा परिषद सदस्य श्री.महेंद्र गोडगे, तसेच संगमनेर पंचायत समितीचे सभापती अनिलजी नागणे आणि गटविकास अधिकारी श्री.प्रवीण अण्णासाहेब सिनारे यांच्या मार्गदर्शनाची मोठी भूमिका राहिली आहे.गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री.विलास अण्णा सोनवणे, सन्माननीय उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांचे हे एकत्रित श्रमाचे फळ आहे.
💪 अधिकारी वर्गाचे मोलाचे योगदान
गावच्या स्वच्छतेच्या आणि व्यवस्थापनाच्या कामात ग्रामपंचायत अधिकारी श्री. भालेराव व श्री.तडवी यांनी अत्यंत परिश्रम घेतले.त्यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे चिंचोली गुरवने राज्यस्तरीय मान पटकावला.
🌹ग्रामस्थांचा सन्मान प्रेरणादायी उदाहरण
गावातील प्रत्येक नागरिकाने “माझं गाव, स्वच्छ गाव” ही भावना जपली.महिलांनी, युवकांनी,आणि शाळकरी मुलांनी सक्रिय सहभाग घेतला.परिणामी आज चिंचोली गुरव हा आदर्श स्वच्छ गाव म्हणून राज्यभर गाजत आहे.
एक गाव, एक ध्येय स्वच्छ,सुंदर व हरित महाराष्ट्र
या सन्मानाने केवळ चिंचोली गुरवच नव्हे,तर संपूर्ण संगमनेर तालुक्याचा अभिमान वाढविला आहे.ग्रामपंचायतीचा हा सन्मान अन्य गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
