ऐन दिवाळीत काळाबाजार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा घाला..! तब्बल 11 लाखांचा गोरगरिबांचा रेशन तांदळाचा साठा जप्त..450 गोण्या तांदळासह आरोपी जेरबंद
अहिल्यानगर (दि.18 ऑक्टोबर 2025):-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेशनिंग तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवणूक करणाऱ्या एका इसमावर स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी नेवासा तालुक्यात मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत तब्बल 450 गोण्या तांदळासह एकूण 11 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
🔍कारवाईचा सविस्तर तपशील
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर धडक कारवाई सुरू आहे. त्याच मोहिमे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि.राजेंद्र वाघ, पो.अंमलदार संतोष खैरे, रमिझराजा आत्तार,प्रकाश मांडगे यांनी पथक तयार करून छापा मारला.पथकाने भानसहिवरे (ता. नेवासा) परिसरात गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता,संदीप सुभाष शिंदे (वय 35 रा.भानसहिवरे) हा इसम काळाबाजारासाठी रेशनिंग तांदळाचा मोठा साठा करून ठेवत असल्याची खात्री मिळाली.
🚨गोडाऊनवर छापा आणि मोठा साठा जप्त
दि.17 ऑक्टोबर रोजी नेवासा पोलीस स्टेशनचे सपो.नि.अमोल पवार यांच्या उपस्थितीत पंचासमक्ष छापा टाकण्यात आला.या कारवाईत शिंदे याच्या गोडाऊनमध्ये 450 गोण्या (22,500 किलो) रेशन तांदळाच्या आढळल्या.चौकशीत आरोपीने कबुली दिली की हा तांदूळ त्याने भगवान पुंड (रा. करजगाव) व इतर काही रेशन दुकानदारांकडून काळाबाजारातून खरेदी केला होता.हा माल तो संजय अग्रवाल, गजानन अॅग्रो, करोडी (जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडे विक्रीसाठी ठेवला होता.
⚖️ गुन्हा दाखल
ताब्यातील आरोपी संदीप सुभाष शिंदे यास मुद्देमालासह नेवासा पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, गु.र.नं. 899/2025 असा गुन्हा जिवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 नुसार दाखल करण्यात आला आहे.
👮♂️कारवाईत सहभागी अधिकारी
ही यशस्वी कारवाई श्री. सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली,स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार कबाडी,पो.उप.नि. राजेंद्र वाघ, पो.अंमलदार संतोष खैरे, रमिझराजा आत्तार,प्रकाश मांडगे तसेच नेवासा पोलीस स्टेशनचे सपो.नि.अमोल पवार यांनी संयुक्तपणे केली आहे.
💬निष्कर्ष
दिवाळी सणात रेशन तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीवर झालेली ही कारवाई संपूर्ण जिल्ह्यासाठी धडा ठरणारी आहे. या कारवाईमुळे काळाबाजार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून पोलिस दलाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
