“कोविड काळातील वैद्यकीय गैरप्रकाराचा पर्दाफाश..न्यायालयाच्या आदेशानंतर नगर शहरातील त्या सहा फेमस डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा तोफखान्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कोविड महामारीच्या काळात रुग्णावर चुकीचा उपचार करून त्याचा मृत्यू झाल्या प्रकरणी तब्बल चार वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला आहे. अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात डॉ.गोपाळ बहुरुपी यांच्यासह पाच डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या थेट आदेशानुसार नोंदविण्यात आला असून वैद्यकीय क्षेत्रात यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रकरणाचा आढावा
२०२०-२०२१ मध्ये कोविड महामारी दरम्यान बबनराव नारायण खोकराळे यांना साधा खोकला झाला म्हणून ते अहिल्यानगर मधील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले.मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना जबरदस्ती कोविड पॉझिटिव्ह ठरवून बळजबरीनं दाखल केलं. चुकीचे उपचार,आर्थिक उकळपट्टी आणि निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला.त्यांचे पुत्र अशोक खोकराळे यांनी याविरोधात न्यायासाठी चार वर्षं झगडत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली.
न्यायालयाचे आदेश
खंडपीठाने पोलिसांना फटकारत दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्देश दिले की,संबंधित पाच डॉक्टरांविरुद्ध भारतीय दंड विधानातील गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवावा.त्यानुसार दि.१८ ऑक्टोबर २०२५ रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दोषी डॉक्टरांची नावे
१)डॉ.गोपाळ बहुरुपी – न्यूक्लिअस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
२)डॉ. सुधीर बोरकर
३)डॉ. सचिन पांडोळे कोविड सेंटर
४)डॉ.अक्षदीप झावरे झावरे हॉस्पिटल
५)डॉ.मुकुंद तांदळे ग्लोबस पॅथॉलॉजी अँड इम्युनोअस
कायदेशीर लढाईतील प्रमुख वकील
या प्रकरणात अशोक खोकराळे यांच्या वतीने ॲड.राजेंद्र देशमुख (सिनिअर कॉन्सिल,छत्रपती संभाजीनगर),ॲड.मंजुषा जगताप/वारे,ॲड.अनिकेत कुलाळ (अहिल्यानगर) यांनी भूमिका बजावली.
सध्या स्थिती
तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून,आता संबंधित डॉक्टरांना अटक कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
