संजय वैरागर प्रकरणी आरोपी अजूनही मोकाट;आंबेडकरी,मातंग व बहुजन समाजाचा संताप उफाळला;२४ ऑक्टोबरला जिल्हा पोलीस अधीक्षकांना धडक देणार निवेदन..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- सोनई (ता.नेवासा) येथील मागासवर्गीय युवक संजय वैरागर यास काही जातीयवादी गावगुंडांनी बेदम मारहाण करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असून,पोलिसांनी तात्काळ अटक करावी,अशी मागणी समस्त आंबेडकरी,मातंग व बहुजन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.२४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय (एस.पी.ऑफिस), अहिल्यानगर येथे समाजबांधव, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात येणार आहे.संविधानिक न्यायासाठी आणि सामाजिक समतेच्या लढ्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
