टापरेवाडीत बेकायदेशीर विज कनेक्शनचा प्रकार उघड! रंजना शेलार यांची महावितरणकडे तक्रार तात्काळ कारवाईची मागणी विहीर नसताना दोन विज कनेक्शन..!
पुणे (भोर प्रतिनिधी):-पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील टापरेवाडी येथे बेकायदेशीर विज कनेक्शनचा गंभीर प्रकार समोर आला असून,याबाबत सौ.रंजना प्रमोद शेलार यांनी महावितरण विभागाकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे.त्यांनी प्रादेशिक संचालक,महावितरण, पुणे यांना ईमेलद्वारे अर्ज पाठवून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, गट नं.७६ आणि ७७ या सर्वेक्षण क्रमांकाच्या शेतजमिनींमध्ये विहीर अस्तित्वात नसतानाही जयवंत एकनाथ सावंत आणि गणपत शंकर सावंत (दोघे रा. टापरेवाडी,ता.भोर,जि.पुणे) यांनी दोन बोगस विज कनेक्शन घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.या कनेक्शनद्वारे बेकायदेशीररीत्या विज वापर होत असल्याची माहिती अर्जदारांनी दिली आहे.अर्जदार सौ.रंजना शेलार यांनी सांगितले की, “आमच्या विहिरीवरूनच त्यांनी हे दोन्ही विज कनेक्शन घेतले असून,कोर्ट कमिशनच्या मोजणी अहवालानुसार ते पूर्णतः बेकायदेशीर आहे.या प्रकाराची चौकशी करून तत्काळ कनेक्शन बंद करण्यात यावे आणि संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
” या प्रकरणात शेलार यांनी महावितरणच्या प्रादेशिक संचालक कार्यालयाकडे (प्रकाश भवन,सेनापती बापट रोड, पुणे) अधिकृतरीत्या तक्रार नोंदवली असून,त्यावर rdpune@mahadiscom.in व rdmsedcipune@gmail.com या अधिकृत ईमेलवरही पाठविण्यात आले आहे.स्थानिक नागरिकांनी ही या तक्रारीची दखल घेऊन महावितरणकडून पारदर्शक चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
