श्रमसंस्कृतीचा जल्लोष..!भव्य सगर उत्सव उत्साहात पार.. तोफखान्यात परंपरेचा महापर्व..!मा.नगरसेवक ॲड.धनंजय जाधव यांच्या हस्ते विविध गोपालकांना भेटवस्तू
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-परंपरा,श्रमसंस्कृती आणि गवळी बांधवांच्या अस्मितेचं प्रतीक ठरलेला भव्य सागर उत्सव २०२५ यंदा तोफखाना परिसरात अभूतपूर्व उत्साहात पार पडला.हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि जनावरांच्या सजावट शर्यतींनी वातावरण दुमदुमले.संपूर्ण परिसरात आनंद, अभिमान आणि ऐक्याचा माहोल निर्माण झाला होता.
या पारंपरिक उत्सवात शहरातील विविध भागांतून आलेल्या गवळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.युवक मंडळे,महिला मंडळे आणि स्थानिक नागरिकांनी उत्साहात सहभाग नोंदवत उत्सवाला भव्यतेची जोड दिली.सजवलेल्या जनावरांच्या शर्यती,पारंपरिक नृत्य,भजन, कीर्तन आणि गवळी संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या विविध स्पर्धांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमा दरम्यान परिसरात ‘जय गोपाल! जय गोविंद!’च्या घोषणांनी उत्सव अधिक रंगतदार बनला.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सिद्धेश्वर तरुण मंडळ जंगुभाई तालीम ट्रस्ट आणि वीरशैव लिंगायत गवळी समाज, तोफखाना,अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे माजी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव यांच्या हस्ते विविध गोपालकांना भेटवस्तू देण्यात आल्या.ॲड.जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “गवळी समाज हा परंपरेचा,श्रमाचा आणि संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. या उत्सवामुळे समाजातील एकोपा आणि संस्कृतीचे जतन अधिक दृढ होते,” असे ते म्हणाले.संध्याकाळपर्यंत चाललेल्या या उत्सवात लोकांनी मनसोक्त जल्लोष केला आणि अखेर दीपप्रज्वलन व आरतीने सागर उत्सवाचा समारोप करण्यात आला.
