गर्दीचा फायदा घेवून सोनसाखळी चोरणा-या भामट्याला कोतवाली पोलीसांनी पकडले;चोरीचा १.५ लाखांचा माल हस्तगत..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरी करणाऱ्या एका भामट्याला कोतवाली पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहे.चोरी गेलेला तब्बल १.५० रू.लाखांचा सोन्याचा ऐवज पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केला असून या कामगिरीचे शहरात कौतुक होत आहे.घटना अशी आहे की, दि.२३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी सुमारास अहिल्यानगर ते नाशिक बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत आरोपीने प्रवासी महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे,७५,००० रु.किंमतीचे मिनी गंठण आणि गणेश विजय साळी यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची,७५, ००० रु.किंमतीची सोन्याची चैन चोरून नेली होती. या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गु.र. नं. ९७६/२०२५ अंतर्गत बीएनएस कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.
सखोल चौकशीतून एकनाथ महादेव मासाळकर (वय ४५, रा. नाथनगर,पाथर्डी) हा संशयित आढळून आला.त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.आरोपीची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता चोरी गेलेला एकूण १.५० रु.लाखांचा सोन्याचा माल हस्तगत करण्यात आला.या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कार्यवाही केली.या पथकात पोसई.गणेश देशमुख,पोहेकॉ.दौड,वसिम पठाण,शाबीर शेख,विशाल दळवी,विनोद बोरगे,पोना. वाघचौरे,दीपक रोहकले,सत्यम शिंदे,अभय कदम,अमोल गाढे, सचिन लोळगे,सुरज कदम, दत्तात्रय कोतकर,शिरीष तरटे, अतुल काजळे,राम हंडाळ यांनी सहभाग घेतला.पुढील तपास पोहेकॉ औटी हे करीत आहेत.
