कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई गोमांस विक्री करणारा कुरेशी अटकेत;९१ हजारांचा मुद्देमाल जप्त!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरात गोमांस विक्री व जनावरांची बेकायदेशीर कत्तल रोखण्यासाठी कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.दि.२७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोतवाली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की,बाबा बंगाली हमालवाडा चौक परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांच्या मासाची विक्री केली जात आहे तसेच जनावरे कत्तलीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.त्यानुसार कोतवाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी गुन्हे शोध पथकासह या ठिकाणी छापा टाकला.छाप्यात रऊफ गणी कुरेशी (वय ६०,रा.बाबा बंगाली हमालवाडी,अहिल्यानगर) हा व्यक्ती गोमांस विक्री करताना आढळून आला.तपासादरम्यान त्या ठिकाणी विविध आकाराचे मांसाचे तुकडे लटकवलेले आढळले.झडतीदरम्यान पोलिसांनी एकूण ९१,७००/रू. किमतीचा मुद्देमाल जप्त केला, त्यामध्ये अंदाजे १७० किलो गोमांस किंमत ५१,०००/रु. व एक जिवंत जर्सी जातिची गाय किंमत ₹४०,०००/- कत्तलीसाठी वापरण्यात येणारा सत्तूर ₹२००/- वजन काटा ₹५००/- यांचा समावेश आहे.
या प्रकरणी गुन्हा क्र. (नोंद प्रलंबित) अंतर्गत भा.द. संहिता कलम २७१ तसेच महाराष्ट्र पशसंवर्धन (सुधारणा) अधिनियम १९९५ सुधारित २०१५ चे कलम ५(अ), (ब), (क), ५ आणि प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचे कलम ३.११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास पोहेकॉ.बोरगे करत आहेत.या कारवाईत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,पोसई गणेश देशमुख, पोहेकॉ दौड,वसिम पठाण, विशाल दळवी,विनोद बोरगे, वाघचौरे,दीपक रोहकले सत्यम शिंदे,अभय कदम,अमोल गाढे, सचिन लोळगे,सुरज कदम, दत्तात्रय कोतकर,शिरीष तरटे, अतुल काजळे, राम हंडाळ यांनी सहभाग घेतला.
