जनतेच्या आशीर्वादाने विकासाची नवी पहाट प्रभाग क्र.३ मधून काका शेळके निवडणूक रिंगणात..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सामाजिक कार्याचा ठसा उमटवत लोकसेवेचा संकल्प केलेले सूर्या फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तसेच डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख काका शेळके यांनी प्रभाग क्रमांक तीन मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
सूर्या फाउंडेशन सर्वांसाठी गोरगरिबांसाठी मोफत ॲम्बुलन्स

काका शेळके यांनी आपल्या सर्व मित्रपरिवार, माता भगिनी, हितचिंतक आणि नागरिकांना भावनिक आवाहन केले आहे. ते म्हणाले….
“मी प्रभाग क्रमांक ३ मधून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडणूक लढणार आहे.आपल्या ओळखीचे, नातेवाईक किंवा मित्रपरिवार असतील, तर त्यांना विनंती करा आपल्या हक्काच्या माणसाला ‘काका शेळके’ यांना साथ द्या. आपण सर्व माझ्यासोबत आहातच, पण मला तुमचा आणखी सक्रिय पाठिंबा हवा आहे. पुढील दोन महिन्यांचा थोडा वेळ मला द्या, त्यानंतरच्या पाच वर्षांत आपल्या सर्वांनी सांगितलेली कामे पूर्ण करण्याचा मी शब्द देतो.”
काका शेळके यांनी आपल्या सामाजिक कार्यातून अनेक उपक्रम राबवले असून,शैक्षणिक मदत,आरोग्य शिबिरे,रक्तदान, आपत्तीग्रस्तांना मदत अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.त्यांच्या या सेवाभावी आणि जनतेशी नातं जपणाऱ्या स्वभावामुळे प्रभाग क्र.३ मध्ये निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा सुरू आहे.स्थानिक पातळीवर तरुण आणि महिला वर्गात त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून, “जनतेच्या आशीर्वादाने प्रभागाचा विकास साधणार” असा विश्वास काका शेळके यांनी व्यक्त केला आहे.
श्री.काका शेळके
संस्थापक अध्यक्ष-सूर्या फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
उपजिल्हाप्रमुख-डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
