एलसीबीची मोठी कामगिरी.. पवनचक्की परिसरात कॉपर केबल चोरी करणारी टोळी पकडली..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील पारनेर व आसपासच्या परिसरात पवनचक्क्यांच्या टॉवरवरील मौल्यवान कॉपर केबलची चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी संतोष “फिका” लंके (वय ४६, रा. हांगा, ता. पारनेर) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.तपासा दरम्यान एलसीबीने अतुल विश्वनाथ शिंदे (वय ३५, रा. शहाजापूर), संकेतानंद हसके (वय २२, रा. पिंपळगाव कांडा), अनिकेत शशिकांत गवळी (वय ३०, रा. शहाजापूर) यांना अटक केली.चौकशीत या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.त्यांच्याकडून आणखी काही साथीदारांची नावे समोर आली.ऋषिकेश सुनिल पवार (रा. पिंपळगाव कांडा, फरार),अरुण शिवाजी गवळी (रा. शहाजापूर),पप्पू बावाजी जाधव,प्रवीण सावळाराम हसके,श्रीकांत संपत साठे (रा. हांगा),स्वप्नील पवार (रा. शहाजापूर),अक्षय सकट (फरार), यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, फुरकान शेख,अतुल लोटके, गणेश लबडे,रिचर्ड गायकवाड, भीमराज खर्डे,भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर,अरुण मोरे,सुपा पोलीस स्टेशनचे मेघराज कोल्हे, योगेश सातपुते यांनी केली आहे.
