“वसंतनगरच्या जनतेला परिवर्तनाशिवाय पर्याय नाही रवी महाराज राठोड यांचा निर्धार!”
नळदुर्ग (प्रतिनिधी अजित चव्हाण):- शहरातील स्वच्छता, रस्ते,पाणीपुरवठा आणि दिवाबत्ती यांसारख्या मूलभूत सुविधांच्या दुरवस्थेमुळे वसंतनगर येथील जनतेला आता परिवर्तनाशिवाय पर्याय उरलेला नाही,असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे संभाव्य उमेदवार रवी महाराज राठोड यांनी व्यक्त केले आहे.आगामी नगरपालिका निवडणुकीत राठोड हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या तिकिटावर रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे.
राठोड म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासून नळदुर्ग नगरपालिकेचा कारभार पाहत आहोत. शहराचा विकास थांबलेला आहे, पाणीपुरवठा विस्कळीत आहे, रस्त्यांची व गटारींची स्थिती दयनीय आहे, आणि दिवाबत्ती व्यवस्था तर पूर्णतः अपुरी आहे. या सगळ्याला जबाबदार असलेली असंबद्ध प्रशासन प्रणाली आता जनतेने बदललीच पाहिजे.”राठोड यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट पारदर्शक कारभार, सुरळीत पाणीपुरवठा, उत्कृष्ट रस्ते व गटारी व्यवस्था, तसेच नामांकित कंपनीचे पथदिवे बसवून शहराचा चेहरा बदलण्यास कटिबद्ध आहे.तसेच शासकीय योजना प्रत्येक सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटच सक्षम पर्याय असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
