वाळू माफियांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा चाप!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेने जोरदार कारवाई करत तब्बल 15 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत टाटा कंपनीचा विनानंबर ढम्पर व चार ब्रास वाळू हस्तगत करण्यात आली असून, आरोपी सुनिल बबन केदार (वय 30, रा. खडकवाडी,ता.पारनेर) यास अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खननावर कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले होते.सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि.समीर अभंग,पोलीस अंमलदार संतोष खैरे,गणेश लोंढे,बाळासाहेब गुंजाळ,अमृत आढाव,योगेश कर्डीले व चालक अरुण मोरे यांच्या पथकाने माहिती गोळा करून पारनेर परिसरात सापळा रचला.दरम्यान,गवळीबाबा माथा, खडकवाडी गाव शिवारात संशयित विनानंबर पांढऱ्या रंगाचा ढम्पर जात असल्याची माहिती मिळताच पथकाने तत्काळ हालचाल केली.
ढम्पर थांबवून तपासणी केली असता,त्याच्या पाठीमागील हौदात वाळू भरलेली असल्याचे आढळले.सदर ढम्पर चालकाने आपले नाव सुनिल बबन केदार असे सांगितले. त्याच्याकडून ₹40,000 किमतीची 4 ब्रास वाळू आणि ₹15,00,000 किमतीचा टाटा ढम्पर असा एकूण ₹15,40,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोकॉ/1863 योगेश जबाजी कर्डीले यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाणे गु.र.नं. 836/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली,स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीपणे पूर्ण केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
