सागर मुर्तुडकर प्रभाग क्रमांक १० मधून निवडणुकीच्या रिंगणात..!.. युवकांची बदलाची हाक अहिल्यानगरच्या विकासासाठी सदैव सज्ज..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा माहोल तापू लागला असून,प्रभाग क्रमांक १० मधून सामाजिक कार्यकर्ते सागर मुर्तुडकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची अधिकृत घोषणा केली आहे.त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.सागर मुर्तुडकर यांनी एका व्हिडिओ संदेशातून जनतेशी थेट संवाद साधत सांगितले की, “अहिल्यानगरच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी,तरुणांसाठी आणि महिलांच्या न्यायहक्कांसाठी मी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक १० मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था,पाणीटंचाई आणि बेरोजगारी या समस्या कायम आहेत.या सर्व प्रश्नांना न्याय देण्यासाठीच मी मैदानात उतरलो आहे.मुर्तुडकर यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात पुढे म्हटले की,राजकारणात स्वच्छता आणि पारदर्शकता आणण्यासाठी युवा वर्गाने पुढे यायला हवे.मला जनतेचा विश्वास आहे आणि मी जनतेचा सेवक बनून काम करण्यास कटिबद्ध आहे.त्यांच्या या घोषणेनंतर स्थानिक पातळीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.अनेक युवकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला असून, “युवा नेतृत्व म्हणून सागर मुर्तुडकरच आमचा पर्याय” अशी घोषणा करण्यात आली.राजकीय जाणकारांच्या मते,सागर मुर्तुडकर यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.येत्या काही दिवसांत त्यांच्या प्रचार मोहिमेची अधिकृत सुरुवात होणार असून, “विकास आणि जनतेचा हक्क” हा त्यांचा मुख्य मुद्दा असणार आहे.
