अहिल्यानगर पोलिसांचा अभिनव उपक्रम..!शाळा–महाविद्यालयांत ‘निर्भया पथक’ कार्यरत;मुलींच्या सुरक्षेसाठी कडक पावले..महिला,विद्यार्थीनी व अल्पवयीन मुलींच्या संरक्षणासाठी पोलिसांचा पुढाकार सुरक्षित वातावरण निर्मितीला गती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)):-महिलांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि शहरातील शाळा–महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी अहिल्यानगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत ‘निर्भया पथक’ कार्यरत झाले आहे.शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात महिला विद्यार्थिनींना छेडछाड,त्रास,अवांछित वर्तन किंवा गैरप्रकारांचा सामना करावा लागू नये म्हणून हे पथक सज्ज करण्यात आले आहे.
‘कॅम्प पोलिस स्टेशन’ हद्दीतील महिला पोलिसांचे विशेष गस्त पथक दररोज शाळा–महाविद्यालयांच्या परिसरात गस्त घालून मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणार आहे.डॉ.टिपरसे यांनी सांगितले की, “महिलांवरील अत्याचार, छेडछाड,तसेच अल्पवयीन मुलींवरील गुन्हे रोखण्यासाठी पोलीस दल व नागरिकांचा परस्पर सहभाग आवश्यक आहे. विद्यार्थिनींच्या तक्रारी तत्काळ ऐकून त्यावर कारवाई करण्यात येईल.निर्भया पथकाने शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांना भेट देऊन विद्यार्थीनींशी संवाद साधण्यास, त्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. तसेच,विद्यार्थिनींनी कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास पोलीस ठाणे,हेल्पलाईन क्रमांक १०९१ किंवा थेट उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
महत्त्वाचे संपर्क क्रमांक:📞
डायल-११२
📞 पो.ना.शोभा सोनवणे-९३७३१४६४२६
📞 पो.कॉ.संदीप थोरात-७९७२६६४८०७
