प्रभाग क्र.१ मधून दत्ता राठोड निवडणुकीच्या रिंगणात..नळदुर्गच्या राजकारणात खळबळ..भल्याभल्यांना फुटला घाम!
नळदुर्ग (प्रतिनिधी/अजित चव्हाण):-आगामी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असून, सर्वच प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मधून दत्ता राठोड यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येताच स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहे.या घोषणेनंतर प्रभागातील विरोधकांच्या छावण्यांमध्ये खळबळ उडाली असून, “भल्याभल्यांना घाम फुटला” असे चित्र निर्माण झाले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून अशोकभाऊ जगदाळे यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणारे दत्ता राठोड हे त्यांच्या निष्ठा,कर्तृत्व आणि संघटन कौशल्यासाठी ओळखले जातात. स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या अडचणी सोडवणे, शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे,तसेच विकासकामात पुढाकार घेणे या कारणांमुळे त्यांचा प्रभाव वाढला आहे.
दत्ता राठोड यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले,
“अशोकभाऊंच्या विकासाच्या विचारसरणीतून प्रेरणा घेत मी जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज आहे. प्रभाग क्रमांक एक मध्ये नागरिकांची सेवा, स्वच्छता, विकास व पारदर्शक कामकाज हेच माझे ध्येय असेल. जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागणार आहे.”स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, तरुण कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. अनेकांनी राठोड यांच्या नेतृत्वाला पाठिंबा जाहीर केला आहे.“दत्ता राठोड हे विकासवादी आणि लोकाभिमुख उमेदवार आहेत, त्यांनी अनेक वर्षे परिसरातील समस्यांवर आवाज उठवला आहे. अशा उमेदवाराची नगर परिषदेत गरज आहे,” असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.दरम्यान, राठोड यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक एक मधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.येत्या काही दिवसांत त्यांच्या प्रचाराची अधिकृत सुरूवात होणार असून, त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या विजयी जल्लोषाचे वातावरण आहे.
