नागपूर प्रतिनिधी/रवींद्र खेडकर (दि. १४ फेब्रुवारी):- नागपूर शहरात तसेच आजपासच्या खेड्यांमध्ये चोरांचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे.याचा बंदोबस्त करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षकांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की हिंगणा तालुक्यात गाई,म्हशी,शेळ्या, तसेच घरफोड्याअति प्रमाणात वाढले आहे. त्यावर पोलिसांनी वेळीच कारवाई करायला हवी परंतु पोलिसांचे याच्यावर अंकुश राहिले नाही. तसेच शहरापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या वानाडोंगरी नगर परिषदेत सुद्धा चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणीस हे खुद्द नागपूरचे असताना सुद्धा व त्यांच्याकडे गृहमंत्रीपद असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गायांच्याही चोरी होत आहे त्यामुळे स्थानिक जनता विचारात पडली आहे. चोरांचा वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन यावेळी देण्यात आले.निवेदन देता समयी शिवसेना ऊपजिल्हा प्रमुख रविभाऊ जोडांगडे,समाधानभाऊ माने,शुभम बुराडे,पंकज वानखेडे,अनुप डाखळे,संजय कुकडे,अक्षय अवचट,रितिक बेलेकर,राहुल अवचट,दिलिप पांडे,सुनिल जोध,गुणवंता बोरकुुटे,सतदेव यादव,शंकर सांभारे,शुभम गुप्ता,ज्ञानेश्वर बोदिले,गोलु भांगे,तसेच समाधान माने केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली नागपूर जिल्हा सचिव इत्यादी उपस्थित होते.
