देवळी प्रतिनिधी(सागर झोरे):-भिडी येथे गजानन महाराज सेवार्थ मधे विजय ग्रंथ पारायण व प्रगटदिनाला मोठा जन सागर उसळला यामंध्ये अनेक भावीकांनी विजय ग्रंथ पारायण मंध्ये सहभागी होवून पारायणी ग्रंथा सह प्रगटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गजानन महाराज सेवार्थ मधे ७ जानेवारीला विजय ग्रंथ पारायण सूरू करण्यात आले तर १२ जानेवारीला पारायणाची समाप्ती करून १३ जानेवाली ला पारायण ग्रंथ दिंडी व गजानन महाराज प्रगटदिन ग्रामस्थाच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रगटदिनाला भिडी परीक्षेत्रातील २० ते २५ भजणी महिला मंडळानी सहभागी होवून गजानन महाराजच्या पालखी सोहळ्यात भजणी मंडळाच्या टाळ,चिपळ्या,विण्याच्या गजराने,ढोल, तास्याच्या नगा-यानी व गजानन महाराजाच्या जय घोषानाने गांव भ्रमण करीत गांव दूमदूमले या दिंडी सोहळ्यात देवळी,भिडी,बाभूळगाव,काजळसरा खर्डा,रत्नापूर,वाबगाव,टाकळी,आकोली,हूसणापूर,दूरगडा,व इतर गावातिल भजणी महिला मंडळाची उपस्थिती होती.यावेळी प्रगटदिन पालखी सोहळ्याचे व भाविकांचे दहिहांडी चौक,भवाणी मंदिर,लक्ष्मिःमाता मंदिर,गोपाल कृष्ण मंदिर,ग्रा.प.चौक व सत्य साईं सेवा समिती च्या वतिने सहभागी भाविकांचे पाणी,चहा,वास्ता,व फराळाचे वाटप करण्यात आले.प्रगटदीन पालखी सोहळ्याचा समारोह गजानन महाराज सेवार्थ मंधे हरिभक्त पारायण तिजारे महाराज यांच्या काला किर्तनाने व त्यांच्याच हस्ते भजणी मंडळाना मानपानाने गौरवण्यात आले व यामंध्ये (चोपदार)दिंडी रक्षक राजू खडसे,तर महीला रक्षक सूमित्रा नेहारे यांनी वेषभूषनात चोख कार्य पारपाडल्याने त्यांचा ही गौरव करण्यात आला.या प्रगटदिनाला भिडी ग्रामस्थ व यूवकांचे मोठे सहकार्य लाभले.
