अहमदनगर प्रतिनिधी (दि.१४ फेब्रुवारी):-अहमदनगरमध्ये भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकत्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे.केडगाव मध्ये दोन गट समोरासमोर एकमेकांना भिडले असून तुफान दगडफेक करण्यात आली आहे.यात गाड्यांचे नुकसान करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.नगर तालुक्यातील एका गावात झालेल्या विवाह प्रसंगी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला.त्यानंतर एका गटाच्या समर्थकांनी केडगावामध्ये येत हॉटेल रंगोली वर दगडफेक केली.त्यास सातपुते गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिउत्तर दिले.दोन्ही गटाकडून दगडफेक करन्यात आली.दरम्यान रस्तारोको करण्यात आला.या दरम्यान पुन्हा दगडफेक झाली असून रस्त्याने जाणाऱ्या वाहनाचे नुकसान करण्यात आले आहे. दगडफेक झाल्यामुळे केडगावमध्ये अतिशय तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा फौजफाटा तात्काळ केडगाव मध्ये तैनात झाला आहे.
