वर्धा प्रतिनिधी(सागर झोरे):-जय गुरु पंचक्रोशी भजन मंडळ घोंगरा नरखेड काटोल तालुका अनुसया माता महिला भजन मंडळ काटोल या भजन मंडळांने रेडिओ केंद्र 90.4 ला सामुदायिक सांस्कृतिक कार्यक्रम केला.यावेळी हुंडाबळी, दारूबंदी,अंधश्रद्धा या सर्व विषयावर कार्यक्रम करण्यात आला.हार्मोनियम वादक पुरुषोत्तम डांगोरे,तबला वादक योगेश कुमेरिया, खंजिरी वादक अर्जुन शेंडे,गायक अशोक महंत,सुखदेव हनवते,गंगाधर वानखेडे,पंजाब इंगोले,लीलाधर सहारे,यमुनाबाई पिरोलिया,छबुबाई धोटे, वर्षाबाई मोरे,आशा हातमोडे मंदा उईके,वर्षा कुंभलकर,सोनाली गावंडे, इत्यादींची उपस्थिती होती.
