अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ फेब्रुवारी):-जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द कारवाई करुन 20,40,000/- रु. (वीस लाख चाळीस हजार) रुपये किंमतीचे दोन ढंपर व चार ब्रास वाळु असा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/बापुसाहेब फोलाणे,संदीप घोडके,पोना/शंकर चौधरी,भिमराज खर्से, पोकॉ/विनोद मासाळकर व पोकॉ/रणजीत जाधव अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमून अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.वरील पथकाने शेवगाव तालुक्यात जावुन माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने मुंगी ते हातगाव रोडने जावुन मुंगी,ता.शेवगांव येथे कारवाई करुन अवैधरित्या वाळु चोरी व वाहतुक करणारे ठिकाणी छापे टाकुन एकुण 20,40,000/- रुपये किंमतीचे दोन पांढरे रंगाचे ढंपर व त्यामध्ये एकुण 4 ब्रास वाळु असा मुद्देमाल जप्त करुन दोन आरोपीं विरुध्द शेवगांव पोलीस स्टेशन येथे भादविक व पर्यावरण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तो खालील प्रमाणे
अ.क्र.पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम आरोपीचे नाव व पत्ता जप्त मुद्देमाल
1.शेवगांव 172/23 भादविक 379, 511, 34 सह पकाक.3, 15 1. मनोज ऊर्फ मनिष बाळासाहेब बोरुडे वय 24,रा.पाथर्डी 1 फरार आरोपी 20,00,000/- दोन पांढरे रंगाचे ढंपर,40,000/- 4 ब्रास वाळु,एकुण 01 आरोपी ताब्यात घेतले व 1 आरोपी फरार 20,40,000/- दोन पांढरे रंगाचे ढंपर व 4 ब्रास वाळु,सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर,श्री. संदीप मिटके,उपविभागीय पोलीस अधीकारी,श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
