वर्धा प्रतिनिधी (सागर झोरे):-नागपूर विभागातील तृतीयपंथीयांकरिता सामाजिक न्याय विभागामार्फत वर्धा जिल्ह्यातील तृतीयपंथीयांचे हक्क,संरक्षण व कल्याण या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन मार्फत सांस्कृतिक संमेलन,शिबिर व कार्यशाळा राबविण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातील तृतीयपंथींना तृतीयपंथी असल्याचे ओळखपत्र व प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे व जनजागृती करण्याकरिता जगदंबा शिक्षण संस्था जि.बुलढाणा या संस्थेची महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेले आहे.या अनुषंगाने नागपूर विभागातील नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,व चंद्रपूर विभागातील तृतीयपंथीयांना तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर,सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग नागपूर,वर्धा भंडारा,गडचिरोली व चंद्रपूर जगदंबा शिक्षण संस्था बुलढाणा यांच्या विद्यमाने दिनांक 17/02/2023 व 18/02/2023 ला सांस्कृतिक संमेलन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी जास्तीत जास्त संख्येने तृतीयपंथी व्यक्तींनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सिद्धार्थ गायकवाड ( प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर ) यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे स्थळ:-आकरे मंगल कार्यालय, हनुमान टेकडी सामोर, आर्वी रोड,वर्धा,कार्यक्रमाची वेळ : दुपारी 12.30 वाजे पासून
