अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ फेब्रुवारी):-शहरातील टिळक रोड येथील वर्धमान रेसिडेन्सी पटेल मंगल कार्यालयाच्या मागे डॉ.अरुण जगन्नाथ वैद्य यांच्या राहत्या घरात(फ्लॅटमध्ये) चोरट्यांनी बेडरूमची कडी तोडून बेडरूम मध्ये प्रवेश करून डॉ.वैद्य यांना डोक्यात रॉड घालण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन तब्बल २८ तोळे सोने व डायमंडचे दागिने तसेच दहा लाख रुपये रोख रक्कम असा एकूण २१ लाख वीस हजार रुपये मुद्देमालाची चोरी केली आहे.ही घटना बुधवार दि.१५ फेब्रुवारी रोजी रात्री २.३० च्या सुमारास घडली आहे.डॉ.अरुण वैद्य यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून भादविक ३९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
