🔴खुनाच्या प्रकरणातील आरोपीला दिलासा! न्यायालयात जामीन मंजूर..अॅड.महेश तवले व अॅड.संजय दुशिंग यांचा जोरदार युक्तिवाद
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर–मनमाड रोडवरील बोल्हेगाव फाट्या जवळील स्वराज्य कंपनीच्या ट्रॅक्टर शोरूम जवळ घडलेल्या खुनाच्या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीस अहिल्यानगर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १० जानेवारी २०२५ रोजी रात्री ७.३० ते ११ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२.२५ च्या सुमारास आश्वी मारुती कांबळे (रा.निपाणी.जि.बेळगाव) यांच्या डोक्याच्या मागे मोठा दगड घालून त्यांना गंभीर जखमी करून जिवंत ठार केल्याची घटना घडली होती.याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खुनाच्या तपासा दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी भास्कर विठ्ठल देशमुख याचे नाव निष्पन्न करून त्यास ताब्यात घेतले होते.आरोपीवर सदर गुन्ह्याचे मुख्य आरोप करण्यात आले होते. पोलिस तपासात त्याच्यावर गंभीर आरोप नोंद करण्यात आले असले तरी,बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात जामिनासाठी जोरदार युक्तिवाद मांडला.
वकिलांचा प्रभावी युक्तिवाद- न्यायालयाचा निर्णय बचाव पक्षाच्या बाजूने
आरोपीच्या बाजूने प्रस्तुत केलेल्या जामिन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी होत असताना,बचाव पक्षाने आरोपी विरुद्धचे आरोप परिस्थितिजन्य असल्याचे निदर्शनास आणले. आरोपीवर दाखल गुन्ह्यात तो थेट सहभागी असल्याचे ठोस पुरावे नसल्याचे मांडत जामीन मंजूर करावा,अशी विनंती करण्यात आली.न्यायालयाने दोन्ही बाजूंची मते ऐकून बचाव पक्षाचे युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी भास्कर विठ्ठल देशमुख यास जामीन मंजूर केला.
वकिलांची महत्त्वपूर्ण भूमिका
या प्रकरणात आरोपीच्या बाजूने नामांकित वकील अॅड.महेश तवले आणि अॅड.संजय दुशिंग यांनी प्रभावीपणे काम पाहत जामीन मिळवून दिला.दोन्ही वकिलांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आरोपीस न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
