बसमध्ये ‘रिलस्टार’ कोमलचा खरा रोल उघड..! प्रेमीयुगुल बंटी–बबली जोडी अटकेत;तब्बल 9.35 लाखांचा मुद्देमाल जप्त..! स्थानिक गुन्हे शाखेचा यशस्वी सापळा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-बसमधील महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरणारी सराईत महिला गुन्हेगार आणि तिचा साथीदार अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या सापळ्यात अडकले.‘रिलस्टार’ म्हणून ओळखली जाणारी आणि इंस्टाग्रामवर तब्बल 50 हजार फॉलोअर्स असलेली कोमल नागनाथ काळे (वय 19, रा. शेवगाव) आणि तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर (वय 25, रा. निपाणी जळगाव,ता.पाथर्डी) या बंटी–बबली जोडीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
पथकाने मिळून ₹9 लाख 35,230/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये सोन्याचे दागिने,रोख रक्कम, तसेच कोमलने चोरीच्या पैशातून खरेदी केलेला iPhone 17 Pro Max देखील आहे.दि.19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता फिर्यादी अलका पालवे या पाथर्डी ते कल्याण एस.टी.ने प्रवास करत असताना त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिणे आणि रोकड अनोळखी महिलेकडून लबाडीच्या हेतूने चोरी झाली.या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1275/2025, कलम 303(2) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील बसमधील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना दिले.पोलीस पथकाला माहिती मिळाली की संशयित महिला आरोपी कोमल काळे पाथर्डी बसस्थानक परिसरात दिसत आहे.पथकाने सापळा रचून तिला ताब्यात घेतले.चौकशी दरम्यान तिने गुन्ह्याची कबुली देत चोरीचा मुद्देमाल आपल्या प्रियकराकडे दिल्याचे सांगितले.त्यानंतर आरोपी सुजित चौधर याचा शोध घेऊन त्याला शेवगाव येथून अटक करण्यात आली. त्याच्या घरी झालेल्या तपासा दरम्यान दोघांनी एकत्र चोरी केलेल्या पैशातून घेतलेले ₹1,70,000/- किमतीचा iPhone 17 Pro Max,₹15,000/- किमतीचा Oppo मोबाईल,6.5 तोळे सोन्याचे दागिणे (किंमत ₹7,48,000/-) ₹2230/- रोख,असा एकूण ₹9,35,230/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.चौकशी दरम्यान आरोपींनी आणखी दोन चोरींची कबुली दिली.कोमल हिच्या इंस्टाग्रामवर 50 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स असून तिचा आयडी – komal_kale_1__ असा आहे.
मात्र तिच्या नावावर आधीच,शिरुर कासार (बीड),गेवराई (बीड),सुपा (अहिल्यानगर),येथे मिळून 3 गुन्हे नोंद आहेत.त्याच्या विरोधात अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात दरोडा,जबरी चोरी, घरफोडी अशा प्रकारचे 8 गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबड्डी यांच्या सूचनेनुसार सपोनि/ हरिष भोये पोलीस अंमलदार सुरेश माळी, विष्णु भागवत,फुरकान शेख, दिपक घाटकर,भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर,किशोर शिरसाठ,विशाल तनपुरे,प्रकाश मांडगे,भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ,प्रशांत राठोड, भगवान थोरात,जालींदर माने, महिला पोलीस अंमलदार वंदना मोडवे,भाग्यश्री भिटे,सारिका दरेकर,ज्योती शिंदे,सोनाली भागवत,चालक भगवान धुळे यांनी केली आहे.
