बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीने उजळले सिद्धार्थनगर.. महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंचशील विद्या मंदिरात अभिवादन कार्यक्रम..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सिद्धार्थनगर येथील ऐतिहासिक पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेत,ज्या पवित्र भूमीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःभेट देत पदस्पर्श केले होते,त्या स्थळावर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अत्यंत भावपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम पार पडला.

या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी कोटी-कोटी प्रणाम केले.कार्यक्रमास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आयु.जगदीश भांबळ,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, युवानेते सुरेशभाऊ बनसोडे, अशोकराव गायकवाड,विजयराव भांबळ,संस्था अध्यक्ष सुमेध गायकवाड,सचिव प्रा.जयंत गायकवाड,विश्वस्त रवींद्र कांबळे, किरण गायकवाड,विशाल गायकवाड,अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव,सुजन भिंगारदिवे,समीर भिंगारदिवे, सुभाष वाघमारे,दीपक वाघमारे, दीपक सरोदे,मोहन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक शेखर उंडे, तसेच वांगणे मॅडम, शिरसाट मॅडम, तिवारी मॅडम, उकर्डे सर, साबळे सर, पाखरे सर यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.कार्यक्रमा दरम्यान संस्था अध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी बाबासाहेबांनी संस्थेला दिलेल्या भेटीची आठवण करून देत बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील मौल्यवान पत्रही मान्यवरांना दाखवले.“ही पवित्र जागा केवळ शैक्षणिक संस्था नाही,तर बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा विद्यार्थ्यांसह समाजाला प्रेरणा देत राहणार आहे,” असे ते म्हणाले.तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आयु. जगदीश भांबळ म्हणाले,“महापरिनिर्वाण दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नाही; तर बाबासाहेबांच्या विचारधारेची उजळणी करण्याचा दिवस आहे. समता, न्याय आणि मानवी स्वातंत्र्याची त्यांनी दिलेली मूल्यव्यवस्था आजही समाजाला दिशा देत आहे. या पवित्र भूमीवर उभे राहणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.”संस्था बाबासाहेबांनी दाखवलेल्या शिक्षण, प्रगती आणि समतेच्या मार्गावर अधिक प्रभावीपणे कार्यरत राहील, अशी भावना कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीने उजळलेल्या या ऐतिहासिक स्थळी कार्यक्रम अत्यंत दिमाखात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
