नगरमध्ये मसाज सेंटरच्या आड वेश्याव्यवसायाचा धक्कादायक पर्दाफाश..!अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची धाडसी कारवाई महिलांची सुटका..मुख्य सराईत जाळ्यात..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मोठा भांडाफोड केला आहे. नगर–मनमाड रोडवरील साई मिडास इमारतीत चालणाऱ्या “अक्युम मसाज / स्पा सेंटर”वर टाकलेल्या छाप्यात महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीस भाग पाडण्याचा प्रकार उघड झाला.पोलिसांकडे गुप्त माहिती आल्यावर निरीक्षक देशमुख यांच्या पथकाने एक बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर पथकाने कारवाई करताच महिलांची देहविक्री घडवून आणण्याचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
या छाप्यात मसाज सेंटर चालवणारा अनिकेत अशोक बचाटे (वय 27, रा. जिनती कुंभारगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर, ह. रा. आक्युम स्पा सेंटर) हा मुख्य आरोपी अटकस जाळ्यात अडकला आहे.छाप्यामध्ये विविध राज्यांतील नाशिक, कोंढवा, पुणे, हरियाणा व उत्तराखंड येथील महिला आढळून आल्या असून, त्यांना येथे नगरमध्ये राहण्यास भाग पाडत जबरदस्तीने अनैतिक व्यापार करवून घेतल्याचे महिलांनी पोलिसांना सांगितले.या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी अनिकेत बचाटे याच्यासह एका ग्राहकावरही अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5, 7 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे सहाय्यक फौजदार शकील अहमद शेख, पोलिस हेडकॉन्स्टेबल समीर अबुतालीब सय्यद, महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल अर्चना रामभाऊ काळे व मपोहेकॉ अनिता कानिफनाथ पवार यांच्या पथकाने केली.
