निमगावच्या चिमुकल्यांचा झंझावात!केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत निमगाव शाळेचा धमाकेदार ‘फर्स्ट’
श्रीरामपूर (प्रतिनिधी) :-खैरी निमगाव केंद्रातर्फे आयोजित विविध गुणदर्शन स्पर्धांना गोंडेगाव प्राथमिक शाळेत रंगत आणली. यामध्ये निमगावच्या चिमुकल्यांनी जबरदस्त कलाप्रदर्शन करीत सांस्कृतिक कार्यक्रम (लहान गट) स्पर्धेत जि.प. प्रा. शाळा, निमगावने अव्वल क्रमांक पटकावून केंद्रात बाजी मारली.कथाकथनातही निमगावच्या गुणवंतांचा जलवा दिसला. बालगटात इयत्ता ३ वीची गौरी ज्ञानेश्वर धुळगंड हिने प्रभावी कथाकथन सादर करत पहिला क्रमांक आपल्या नावे केला. तर हस्ताक्षर स्पर्धेत किलबिल गटात इयत्ता २ रीची आराध्या सचिन पवार हिने स्वच्छ, सुंदर लेखनातून दुसरा क्रमांक मिळवला.स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शिक्षिका मीना निकम, प्रतिभा तोरणे, सुधा गमे, तसेच मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. ग्रामस्थ आणि पालक भाऊसाहेब पंडित, राहुल त्रिभुवन, शाहरुख सय्यद, दादासाहेब उंदरे, प्रेम त्रिभुवन यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांना पेन व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, विस्तार अधिकारी दिपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलगर, केंद्रसमन्वयक वाघुजी पटारे, सरपंच दत्तात्रय झुराळे, उपसरपंच विजयसिंग परदेशी, पत्रकार साईनाथ बनकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश तरस, उपाध्यक्षा सोनाली महेंद्र साबळे तसेच सर्व पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले.
