केंद्रस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश..हिवरगाव पावसा येथील विद्यार्थी विविध गुणदर्शन स्पर्धेत चमकले
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे झालेल्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव पावसा शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठे घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत एकूण तेरा शाळांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण स्पर्धेत हिवरगाव पावसा गावातील विद्यार्थ्यांचा दबदबा राहिला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुण व कौशल्य पणाला लावत स्पर्धेत चमक दाखवली व मोठे यश संपादन केले.
हस्ताक्षर स्पर्धा किलबिल गट
(इ.1ली/2री)
प्रथम क्रमांक- स्वराज्य विकास गडाख,वक्तृत्व स्पर्धा
किलबिल गट (1 ली/2 री)
द्वितीय क्रमांक – सबुरी काशिनाथ पावसे,
बालगट -(3री/4थी)
प्रथम क्रमांक -धनश्री रामनाथ पावसे,वेशभूषेनुसार सादरीकरण
बाल गट ( 3री/4थी)
तृतीय क्रमांक -अद्विक अजित गडाख,
सांस्कृतिक कार्यक्रम
बाल गट (1ली ते 4थी)द्वितीय क्रमांक
समुहगीतगायन स्पर्धा
बाल गट (1ली ते 4थी)
द्वितीय क्रमांक-
वैयक्तिक गीतगायन
किलबिल गट (1ली /2री)
प्रथम क्रमांक – भक्ती दत्तात्रय पावसे,बाल गट (3री /4थी)
प्रथम क्रमांक – वैष्णवी आदिनाथ वाकचौरे,गोष्ट कथा सादरीकरण
बाल गट ( 3री/4थी)
तृतीय क्रमांक तनिष्का शरद पावसे यांनी विविध गुणदर्शन स्पर्धेत यश मिळवले.या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक आर.पी.राहणे तसेच शिक्षक अक्षय खतोडे हरिभाऊ सहाने, श्रीमती मीनल बिडवे यांचे मार्गदर्शन लाभले.स्पर्धेत सहभागी व यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
