रब्बीसाठी पाणी सुटले..! चिंचोली गुरव प्रकल्पाने बळीराजाच्या आशांना दिले बळ..
संगमनेर/प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):-जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील मध्यम प्रकल्पातून (एम.आय. टँक) रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे.पाण्याचे आवर्तन सुरू होताच परिसरातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकल्पातून पाणी उपलब्ध झाल्याने रब्बी हंगामातील गहू,हरभरा,ज्वारी आदी पिकांना नवसंजीवनी मिळणार असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर पाण्याचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत पाणी सोडण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतीसाठी नव्या आशा पल्लवित झाल्या असून यंदाचा रब्बी हंगाम जोमाने बहरणार, असा विश्वास शेतकरी बांधवांनी व्यक्त केला आहे. पाणी आवर्तन सुरू झाल्याने शेतीकामांना गती मिळणार असून उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.या प्रसंगी परिसरातील असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच संगमनेर तालुका शिवसेना अध्यक्ष राजेंद्र सोनवणे,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रविदास सोनवणे,दगेश सोनवणे, सचिन आभाळे,चंद्रभान सोनवणे, बाबासाहेब माळी,प्रदोष सोनवणे, खंडेराव सोनवणे, आबा सोनवणे, संभाजी सोनवणे, अमोल सोनवणे, रमण गडाख, सुरेश दळवी, किशोर गडाख आदी मान्यवर उपस्थित होते.चिंचोली गुरव प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण झाले असून बळीराजा सुखावला आहे.
