Maharashtra247

विक्रीस बंदी असलेली सुगंधी तंबाखू,गुटखा,पानमसाला, जवळ बाळगणाऱ्या इसमास मुद्देमालासह केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२० फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु,पानमसाला व गुटखा विक्री करीता कब्जात बाळगणा-या इसमा विरुध्द कारवाई करुन 1,92,302/- रु. किंचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/संदीप पवार,दिनेश मोरे,संदीप घोडके,पोना/शंकर चौधरी, पोना/सचिन आडबल,पोकॉ/रणजित जाधव व विजय धनेधर अशांना बोलावुन घेवुन फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.पथक नगर शहर परिसरात फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना पोनि/श्री.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे अंकुश भापकर, (रा.समता नगर,सावेडी) हा सुगंधी तंबाखु,पानमसाला व गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतो आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन पंचांना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.पथकाने पंचांना सोबत घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी समता नगर येथे जावुन संशयीताचे राहते घराचा शोध घेवुन अचानक छापा टाकला असता तेथे एक इसम घरासमोरील पडवीमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेली सुगंधी तंबाखु, पानमसाला व गुटखा कब्जात बाळगतांना दिसला त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)अंकुश अविनाश भापकर (वय 29,रा. राजमाता कॉलनी,समता नगर, सावेडी,अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे सुगंधी तंबाखु, पानमसाला व गुटख्या बाबत विचारणा करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागा त्यास अधिक विश्वासात घेवुन बारकाईने विचारपुस करता त्याने सदर सुगंधी तंबाखु व विविध कंपनीचा पानमसाला व गुटखा हा विक्री करणेसाठी आणला आहे अशी माहिती दिल्याने त्यास सुगंधी तंबाखु व विविध कंपनीचा पानमसाला व गुटखा अशा एकुण 1,92,302/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेतले व पोहेकॉ/440 संदीप कचरु पवार ने.स्थागुशा अ.नगर यांचे फिर्यादी वरुन तोफखाना पोस्टे येथे गु.र.नं. 96/23 भादविक 188, 272, 273, 328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील कायदेशिर कारवाई तोफखाना पोस्टे करीत आहे. सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री. अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page