सायबर पोलीस स्टेशन मधील पोलीस नाईक अभिजीत अरकल व पोलीस अंमलदार राहुल गुंडू डिप्लोमा इन सायबर लॉ पदविकेमध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२० फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील सायबर पोलीस स्टेशन मधील पोलीस नाईक अभिजित अरकल, पोलीस अंमलदार राहुल गुंडू यांनी न्यू लॉ कॉलेज अहमदनगर व एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ यांच्या संयुक्त विद्यमाने डिप्लोमा इन सायबर लॉ (DIPLOMA IN CYBER LAW) या पदवीकेमध्ये विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण होऊन डिप्लोमा इन सायबर लॉ )DIPLOMA IN CYBER LAW) ही पदवी प्राप्त केली.दि 20 फेब्रुवारी रोजी न्यू लॉ कॉलेज मार्फत घेण्यात येणारी ही पहिलीच बॅच होती या पदवीकेचे CANVOCATION CEREMONY हे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अद्यक्ष माजी आमदार श्री. नंदकुमार झावरे,उपअध्यक्ष श्री.आ.एन दरे,सचिव श्री.जे.डी.खानदेशे,सहसचिव श्री.वि.डी.आठरे पाटील,विश्वस्त श्रीमती डी . एस.म्हसे पाटील,खजिनदार श्री.वि.पी. भापकर,न्यू लॉ कॉलेज अहमदनगरचे प्राचार्य श्री.तांबे सर,पांढरे सर, श्रीमती.प्रियंका खुळे,अतुल म्हस्के सर,दीपक वराट सर, सुनील जाधव सर,शेळके सर, मोरे सर,तोडमल सर,पाचे सर, राकेश बोगा,केदार सर,यांनी उपस्थित राहून यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.