लग्नाचे आमिष दाखवून लष्करी जवानाचा तरुणीवर शिर्डीत अत्याचार
शिर्डी प्रतिनिधी(दि.२० फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणीची शेजारी असलेल्या मैत्रिणीशी ओळख होती.तिच्या पतीकडे वारंवार येत असलेला व लष्करात नोकरीस असलेल्या तरुणाची ओळख झाली.त्यातून त्यांचे प्रेमसंबंध तयार झाले.त्याने तिला शिर्डीत व अज्ञात ठिकाणी नेऊन लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याची फिर्याद संबंधित तरुणीने दिल्यावरून वाईबोती,ता.येवला येथील आरोपी मनोज बाळासाहेब पवार याचेविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी येथील पोलीस ठाण्यात पोलिसांनी भा.दं.वि.कलम 376, 376 (2) (एन) 343, 347 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.