Sunetra Pawar राष्ट्रवादीत माेठ्या घडामाेडी..सुनेत्रा पवार उद्याच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार
अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माेठ्या हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थखातं, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क यासारखे महत्त्वाची खाती हाेती. ही महत्त्वाची खाती कुणाकडे द्यायची, यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यानुसार पक्षप्रमुख म्हणून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामाेर्तब हाेऊन, त्या उद्याच (ता. ३१) उपमुख्यमं त्री पदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या आमदरांच्या बैठकीचे आयाेजन उद्या (ता. ३१) करण्यात आले आहे. या आमदारांच्या बैठकीत त्यांची विधीमंडळ नेतेपदी निवड हाेणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी पक्षाची जबाबदारी पवार कुटुंबातील व्यक्तीकडेच असावी, अशी भाजप नेतृत्वाचे मत हाेते. तसेच राष्ट्रवादीतील बहुतांश नेतेही यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्येही तब्बल ४५ मिनिटांहून अधिक चर्चा झाल्याची माहिती आहे.
त्यामुळे पक्षाची धुरा सुनेत्रा पवार याच सांभाळतील, म्हणून त्यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार याही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाल्याची माहिती आहे.अजित पवारांच्या जाहिरातीचे काम पाहणाऱ्या डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा हे तसा निरोप घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.
व्हीसीद्वारे बड्या नेत्यांची बैठक
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी अजित पवारांच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमानंतर व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांच्यासाेबत बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या उद्या (ता. ३१) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
